शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या स्वागताअध्यक्षतेखाली आज गुरुवार १७ रोजी दुपारी ४:३० वाजता कोळा गटात आयोजित मेळाव्यात डॉ.अनिकेत देशमुख यांना वगळून घेतल्यामुळे सांगोल्यात शेका पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. या मेळाव्याबाबत डॉ. अनिकेत देशमुख म्हणाले , शेकापक्षातील मोठं पद माझ्याकडे असताना मला साधे विचारलेही नाही अगर निमंत्रणही नाही. तुम्ही जर मला न विचारता मेळावा घेत असाल तर पक्ष कोणा एकाच्या दावणीला बांधला आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या चिटणीस व पक्षातील वरिष्ठांना विचारात न घेता एकाधिकार नाही पध्दतीने काम चालू आहे. ते म्हणाले याबाबत तालुका चिटणीस दादाशेठ बाबर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनीही मला विचारून मेळाव्याचा कार्यक्रम घेतला नसल्याचे स्पष्ट सांगितले दरम्यान सत्काराचा कार्यक्रम आचारसंहितेत घेता येत नसतो पण कसा घेतला याबाबत , प्रशासनालाच अधिक माहिती असणार मात्र सदरचा कार्यक्रम शेकापचा अधिकृत नसल्याचे डॉ. अनिकेत देशमुख यांनी सांगितले.सदर मेळाव्याबाबत शेकापचे चिटणीस भाई जयंत पाटील यांच्याकडे विचारणे केली असता कोळ्यातील मेळाव्या विषयी मला काहीच माहिती नाही व मी येणार ही नाही असे सांगितल्यामुळे हा मेळावा शेकापचा अधिकृत मेळावा नसून स्वतःला स्वयंघोषित नेते म्हणून घेणाऱ्या मित्र परिवाराच्या वतीने घेतला आहे त्यामुळे कदाचित माझे पत्रिकेत नाव टाकले नसेल अशा स्पष्ट शब्दात डॉ. अनिकेत देशमुख यांनी कार्यक्रमाविषयी नाराजी व्यक्त केली.