आमदार राजूबाबा आवळे यांचा हालोंडी येथील ग्रामस्थांशी भेट देत संवाद

जनाशिर्वाद पदयात्रेनिमित्त आमदार राजूबाबा आवळे यांनी हालोंडी येथे भेट देत समस्त ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केल्या. गेल्या ५ वर्षामध्ये मतदारसंघातील विविध गावांमध्ये अनेक गावामध्ये विकासकामे पूर्णत्वास पोहोचली आहेत. येत्या काळातही या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मला संधी देण्याचे तसेच महाविकास आघाडी सरकारला पुन्हा पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले. येत्या २० तारखेला हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा…असे प्रतिपादन केले.