गेली 60 वर्ष शेकापचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या सांगोला विधानसभा मतदारसंघावर यावेळी महाविकास आघाडीमधून ठाकरे गटाने दावा सांगितलाय. त्यामुळं आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. आघाडीत ही जागा शेकापला न मिळाल्यास आम्ही लाला बावटा फडकवणार असल्याची माहिती डॉ. अनिकेत देशमुख यांनी दिली आहे.महाविकास आघाडीकडून जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाने बार्शी सोबत सांगोल्याची जागाही मागितली आहे. गेल्यावेळी शिवसेनेचा आमदार असल्याने या जागेवर आमचा हक्क असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यामुळं महाविकास आघाडीला कायम साथ देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची जागा धोक्यात आल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. यातूनच आज डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी आपली भूमिका मांडताना सांगोला विधानसभा हा पहिल्यापासून शेकापचा बालेकिल्ला असल्याने महाविकास आघाडीतून ही जागा आम्हाला नक्की मिळेल असे सांगितले. मात्र जागा वाटपात काही फेरबदल झाल्यास मात्र शेकाप कार्यकर्ते शांत बसणार नसून तसेच झाल्यास शेकाप निवडणूक लढवणार असे संकेत त्यांनी दिले आहेत.
Related Posts
फक्त दिपकआबाच उपेक्षित आणि वंचितांना न्याय देऊ शकतात ; नगरसेविका अप्सराताई ठोकळे
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगोला शहरात शहाजी बापू पाटील यांना मोठा धक्का बसला असून नगरसेविका अप्सराताई ठोकळे यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी…
माळशिरसमधून ‘तुतारी’च्या उमेदवारावर मोहिते-पाटलांकडून शिक्कामोर्तब! राम सातपुते की….
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून माळशिरसचे आमदार राम सातपुते हे मतदारसंघात सक्रिय दिसत नसल्याचं…
आगामी विधानसभा निवडणुकीत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात…….
नोव्हेंबरमध्ये आगामी विधानसभा निवडणूक होणार असल्याचे संकेत दिले गेले आहेत. त्या पद्धतीने प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. प्रत्येक…