आजचे राशिभविष्य! 19 ऑक्टोंबर 2024

मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

वृषभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहने जपून चालवावीत.

मिथुन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

कर्क : शासकीय कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कन्या : वादविवाद टाळावेत. प्रवास शक्यतो टाळावेत.

तूळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. प्रवास सुखकर होतील.

वृश्‍चिक : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मनोबल कमी राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

धनू : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. संततिसौख्य लाभेल.

मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ : गुरुकृपा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.