विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकृती

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार २२ ऑक्टोबर २०२४ पासून संबंधित विधानसभा मतदार संघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत.त्या अनुषंगाने जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांचे पत्ते जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जाहीर केले आहेत.

निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी २२ ते २९ ऑक्टोबर असून या नामनिर्देशन पत्रांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी आहे. ४ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ही सर्व प्रक्रिया संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात केली जाणार आहे.