मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार 

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी मशाल हातात घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यानंतर सांगोला तालुक्यातील दीपकआबा समर्थकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. मा. आम. दिपक आबा साळुंखे पाटील यांचे तालुक्याच्या विकास कामात मोलाचे योगदान आहे. दीपकआबांचा प्रशासनात कामकरण्याचा दांडगा अनुभव आहे. गेल्या पंचवीस वर्षाच्या राजकारणात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी कोणताही भेदभाव न करता जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे.

त्यामुळे शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून तालुका राज्यात आदर्श बनवण्यासाठी तसेच महाविकास आघाडीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पहिला आमदार विजयी करण्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दिपकआबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार जवळा परिसरातील ग्रामस्थांनी केला. महाविकास आघाडीचे सांगोला विधानसभेचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत २१ ऑक्टोंबर रोजी जवळा ता.सांगोला येथील श्री क्षेत्र नारायणदेव मंदिरात नारळ फोडून करण्यात आला.

यावेळी जवळा, बुंरंगेवाडी, आगलेवाडी, भोपसेवाडी, तरंगेवाडी येथील ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित होते.  यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले की, शेतीच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी, तालुक्यात अद्ययावत एमआयडीसी आणण्यासाठी, सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी यंदा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपकआबा साळुंखे पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा सर्वांनी निर्धार केला आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दीपकआबांना दिली आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघाचा विकास कसा करावा याचे व्हिजन दीपकआबा साळुंखे पाटील यांच्याजवळ आहे. मतदारसंघात विकास कामांची मशाल कायमस्वरूपी तेवत ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपकआबा साळुंखे पाटील यांना विजयी करण्यासाठी शिवसेनेची मशाल घराघरात पोहोचण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जीवाची बाजी लावून काम करतील असे ग्रामस्थांनी सांगितले.