तानाजी सावंतांचा पुतण्या शरद पवारांच्या गोटात! तुतारी हाती घेण्याच्या तयारीत….

विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, भेटी घेणे सुरू आहे.अशातच महायुतीशी संबंध चांगले असलेल्या नेत्यांचे संबंधित काहीजण यावेळी शरद पवारांच्या भेटीसाठी आल्याचे दिसून आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर अनिल सावंत हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेमधून तुतारी फुंकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धैर्यशील मोहिते पाटलांनी याआधी पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील इच्छुक उमेदवारांची शरद पवारांसोबत भेट घालून दिली होती.

यामध्ये तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंतही उपस्थित होते. त्यानंतर अनिल सावंत रविवारी पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून निवडणुकीसाठी अनिल सावंत इच्छुक आहेत. मात्र, ही जागा सध्या भाजपकडे आहे. भाजपचेच माजी आमदार प्रशांत परिचारक, भगीरथ भालके हे दाघेही या जागेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक असून यांचाही प्रयत्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत.

तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी दावा केल्यानंतर त्यांचा पुतण्या अनिल सावंत यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या जागेसाठी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आमदारकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जवळ करत तुतारी हाती घेण्याची शक्यतादेखील या निमित्ताने वर्तवली जात आहे.