राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निकाल आला आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे.सर्वोच्च न्यायालयात शरद पवार यांच्या पक्षातर्फे दाखल याचिका फेटाळली आहे. यामुळे अजित पवार यांच्या पक्षाचे घड्याळ चिन्ह कायम राहणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळा ऐवजी दुसरा चिन्ह देण्याची मागणी शरद पवार यांच्या वतीने करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट या याचिकेवर निर्णय होण्याच्या प्रतिक्षेत होते.
Supreme Court Decision About NCP: शरद पवार यांना धक्का, सर्वोच्च न्यायालयाने ती मागणी फेटाळली
