दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.दिवाळी सणाच्या काही दिवसांआधी सगळीकडे मोठी लगबग असते. घराची साफसफाई, दिवाळीची खरेदी, फराळ इत्यादी अनेक गोष्टी दिवाळी सणाला केल्या जातात.करंजी ही वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. तसेच यात सारण भरण्याचे खूप नाजुक काम असते, कारण ते व्यवस्थित भरले गेले नाही, किवा एका बाजूने उघडे राहिले तर तळताना करंजी फुटण्याची शक्यता असते. पण चिंता करु नका अतिशय सोप्या पद्धतीने आज आम्ही करंजी कशी बनवायची हे तुम्हाला सांगणार आहोत.
लागणारे साहित्य
1 किलो मैदा
3 वती बारीक रवा
आवश्यकतेनुसार पाणी
भरण्यासाठी-
3 वाटी सुखे खोबरे खवलेले नारळ
6 ते7 वाटी पिठी साखर
आवश्यकतेनुसार चिरलेले ड्राय फ्रूटस
1 टीस्पून वेलची पावडर
1 टीस्पून जायफळ पावडर
2 टीस्पून खसखस
22 चमचे तूप
तळण्यासाठी आवश्यकतेनुसार तेल
करंजी बनविण्याची कृती
सर्वप्रथम जाड तळाची कढई घ्या, आणि गॅसवर गरम करा. त्यामध्ये सूखे खोबरे खरपूस भाजून घ्या, तो जास्त करपून द्यायचा नाही, थोडा सोनेरी रंगाचा झाल्यावर लगेच काढून घ्या. त्यानंतर त्याच कढईमध्ये रवा पण भाजून घ्या. त्यानंतर थोडे तूप घालून त्यामध्ये सुका मेवा भाजून घ्या. अशाप्रकारे सर्व जिन्नस भाजून घेतल्यानंतर ते सगळे एका मोठ्या परातीमध्ये काढून एकत्र करा. यामध्ये, पिठी साखर, वेलची पूड टाका आणि हे मिश्रण चांगले मिक्स करा.
आता दुसऱ्या बाजूला एका मोठ्या ताटात मैदा चाळून घ्या. यामध्ये तूप गरम करून घाला आणि छान मिक्स करून घ्या. यानंतर हे पीठ पाण्याच्या मदतीने मळून घ्या. आणि मग तासभर हे पीठ बाजूला झाकण लावून ठेवून द्या.
दोन तासानंतर पीठ परत थोडे मळून घ्या, त्यानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे करून पोळी लाटून घ्या, तयार सारण यामध्ये भरा, आणि कडेला पाणी लावून घ्या, आणि कडा बंद करा. यानंतर चक्रीने करंजी कापून घ्या. जेणेकरून करंजी अर्ध गोलाकार आकारात बनेल, अशाप्रकारे सर्व करंज्या बनवून घ्या. आणि तेलात तळून घ्या.