शहरातील मालमत्ता धारकांचा शास्ती कर रद्द करावा या मागणीसाठी सोमवारी दिनांक चार रोजी पालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माजी नगरसेवक शकील सय्यद यांनी हा इशारा दिला याबाबतचे निवेदन उपमुख्य अधिकारी डॉ .भगवान खाडे यांनी दिले .
यावेळी युवा सेनेचे तालुका अधिकारी मानव गवंडी, फजल हवालदार ,दीपक कळसे ,जमीर नालबंद आदी शिवसैनिक उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की संकलित कराच्या बिलामध्ये त्रुटी , शास्तीकर माफी, गुंठेवारी, बांधकाम परवाना , बांधकाम दाखला सक्ती न करणे ,विजेची व्यवस्था ,हस्तांतरण कर आकारणी दुचाकी वाहण्यासाठी एकेरी वाहतूक खुली करणे याबाबत प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे सोमवारी ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे