इचलकरंजीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार ठिकाणी नाकाबंदी!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरांमध्ये चार ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली कर्नाटकातून येणाऱ्या सर्व गाड्यांची तपासणी केली जात आहे. तसेच सांगली नाका, कोल्हापूर नाका, कोरोची नाका या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नाकाबंदी लावण्यात आली. इचलकरंजी कर्नाटकला जोडणाऱ्या नदीवेस नाक्यावरही नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सर्व वाहनांची कसून चौकशी करत आदर्श आचारसंहिता राबवत आहेत. संपूर्ण राज्यांमध्ये लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आचारसंहिता निवडणूक आयोगाने लागू केली. इचलकरंजी शहरात येण्यासाठी चार प्रमुख मार्ग आहेत. या चार प्रमुख मार्गांवर चार ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. विधानसभेच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने या ठिकाणी तीन पोलीस कर्मचारी चार निवडणूक अधिकारी, एक कॅमेरा मन असा पाऊस फाटा तैनात करण्यात आलेला आहे. बाहेरून येणाऱ्या सर्व गाड्यांची कसून चौकशी केली जाते. तसेच तपासणी केली जाते. निवडणूक काळामध्ये गाडीतून पैशांची देवाण-घेवाण होत असते या अनुषंगाने प्रत्येक कोल्हापूर नाका, सांगली नाका, कोरोची नाका, नदीवेस नाका या ठिकाणी नाकाबंदी जोरात सुरू करण्यात आली आहे. येणारी जाणारी प्रत्येक गाडीची कसून चौकशी पोलीस करत आहेत.