जप्त केलेल्या गौणखनिजाचा इचलकरंजीत २७ मार्चला लिलाव!

इचलकरंजी अपर तहसीलदार कार्यालच्या भरारी पथकामार्फत कारवाईत जप्त केलेल्या गौणखनिजाचा लिलाव होणार आहे. अपर तहसील कार्यकक्षेतील मे २०२० ते २७ सप्टेंबर २०२३ अखेर ८ ब्रास मुरूम, ७ ब्रास काळा दगड, नदीची वाळू २ ब्रास, ग्रीड ९ ब्रास व क्रश सँड १.५ ब्रास इतका गौणखनिजाचा साठा जप्त केला आहे.

२७ मार्चला सकाळी अकराला उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाहीर बोलीने लिलाव होणार आहे. इचलकरंजी तहसील कार्यालयाने अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतूकप्रकरणी केलेल्या कारवायांमध्ये १९.५ ब्रास गौणखनिज जप्त केले आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) (८) च्या सुधारित नियमाप्रमाणे बेकायदा गौण खनिज (मुरूम, काळा दगड, नदीची वाळू, प्रीड, क्रश सैंड) वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेतली होती. यावेळी जप्त केलेला साठा उपविभागीय अधिकारी कार्यालय, इचलकरंजी येथे आहे.त्याचा जाहिर लिलाव करण्यात येणार आहे.