लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र दिसून आहे. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. काहींनी स्वबळाचा नारा हाती घेतलेला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाची घोषणा केली होती. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रपणे लढण्याची शक्यता जास्त आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना हे जवळपास एकत्रच लढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची झालेली पीछेहाट त्यासोबत काँग्रेस राहिलेले अस्तित्व यावरच महाविकास आघाडीची उमेद आहे. अशात महाविकास आघाडीचे नेतृत्व म्हणून आमदार सतेज पाटील यांच्यावरच जबाबदारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन दिवसांपूर्वी आमदार सतेज पाटील यांनी आपली भूमीका मांडताना कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहण्याचे संकेत दिले होते.
काँग्रेस – राष्ट्रवादीने यापुर्वी सुध्दा अनेक महापालिका निवडणूका स्वतंत्र लढवल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाची भूमीका अशीच आहे. शक्य होईल तिथं युती होईल. मुंबई, ठाणेसह काही महापालिका निवडणूका स्वतंत्र लढवण्याची शिवसेना ठाकरे पक्षाने भूमिका घेतलेली आहे. कारण प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. काँग्रेसचे वरीष्ठ नेते एकत्र बसून याबाबतीत धोरण ठरवतील. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची युती होईल, पण वेळ आल्यास स्वतंत्र लढण्याचाही तयारी असल्याचे देखील सतेज पाटील म्हणाले.
