सध्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदार संघामध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची सुरू असलेली दिसत आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आवाडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे या दोघांनीही उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्धार केला होता.
त्यापैकी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची समजूत काढण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले. त्यानंतर गुरुवारी त्यांनी मातोश्री येथे खास धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रचारात सक्रिय असेन असे सांगितले.
एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी मात्र महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांचा उमेदवारी अर्ज भरताना पाठ फिरवली. चोपडे यांची अनुपस्थिती त्यांच्या नाराजीचे दर्शन घडवून गेली. तर चोपडे हे उमेदवारी अर्ज भरण्यावर आज देखील ठाम असल्याचे त्यांच्या समर्थकांतून सांगण्यात आले.