सांगोला शहर झपाट्याने वाढते आहे पूर्वी शहराबाहेर वाटणारी कचरा कुंडी वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात,वर्दळीच्या व लोकवस्तीच्या ठिकाणी आली आहे. कचरा डेपोच्या शेजारी लागूनच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,शहरातील सर्वाधिक विदयार्थी संख्येचे सांगोला महाविद्यालय, मुलींचे वसतिगृह तसेच लोकवस्ती आहे. कचरा डेपोतील काचरा सातत्याने पेटवल्यामुळे तेथे प्रचंड धूर होतो. सदरचा धूर हा कचरा डेपोपासून जवळ जवळ दीड-दोन किलोमीटर अंतरावर पसरतो . शेजारील जत सांगोला महामार्गावरील वाहतुकीस या धुरामुळे अडथळा निर्माण होतो.
नागरिकांना या धुराचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो.लहान मुले महीला त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. एकीकडे प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आव्हान माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी करतात व दुसरीकडे हजारो टन कचरा जाळून धूर निर्माण केला जातो. म्हणून सदर कचरा कुंडीतील कचऱ्यावर शासनाने घालून दिलेल्या निर्देशाप्रमाणे योग्य तीप्रक्रिया करावी,कचरा पेटवू नये अशी सातत्याने मागणी या भागातील नागरीक, विदयार्थी,दवाखान्यात येणारे रूग्ण त्यांचे नातेवाईक करीत आहेत.
शहरात येणारा हा कचरा डेपो शहराबाहेर हालवण्यात यावा. या मागणीचा मुख्याधिकारी व सबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने व प्राधान्याने विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे.