सांगोला येथे मराठा आरक्षण आंदोलनाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा

राज्यभर सुरू असलेला मराठा समाज बांधवांचा आंदोलनाला सांगोला शहर व तालुक्यातील (Reservation)मुस्लिम बांधवांनी मुस्लिम समाजाचे प्रमुख हाजी शब्बीरभाई खतीब यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली बुध. दि. १ नोव्हें. रोजी पाठिंबा दिला आहे. या प्रसंगी मुस्लिम समाजाचे प्रमुख हाजी शब्बीरभाई खतीब म्हणाले की, मराठा समाज आपल्या न्याय व हक्कासाठी आरक्षणाची मागणी करत आहे, तरी या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला सांगोला शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजाचा पाठिंबा जाहीर करतो.

यावेळी बोलताना हाजी बशीरभाई तांबोळी म्हणाले की, (Reservation)आत्तापर्यंतचा सांगोला शहर व तालुक्याचा इतिहास पाहता मराठा समाजाने नेहमीच मुस्लिम समाजाच्या मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवांचे आरक्षणासाठी सुरु असलेल्या लढाई मध्ये आम्ही सर्व मुस्लिम समाज नेहमीच आपल्या सोबत आहोत अशी ग्वाही यावेळी हाजी बशीरभाई तांबोळी यांनी दिली.

या प्रसंगी अरविंदभाऊ केदार यांनी सांगोला शहर व तालुक्यातील आंदोलनासाठी मिळत असलेल्या समस्त मुस्लिम समाजाच्या पाठिंब्याबाबत आभार व्यक्त केले. यावेळी सकल मराठा समाज बांधव व मुस्लिम समाजातील कमरुद्दीन खतीब, शफी इनामदार, आयाजबाबा मणेरी, ईलाही खतीब, पत्रकार मिनाज खतीब व गुलामगौस तांबोळी, मज्जिद खतीब, तोफिक मुजावर, रफीक आतार, मोहसीन खतीब, असीफ इनामदार, साहिल खतीब, नवाज तांबोळी, निहाल खतीब, इम्तियाज मणेरी आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.