संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्ह्याचे नेते माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्याच्या राजकीय इतिहासातील ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आणि रेकॉर्डब्रेक शक्तीप्रदर्शन करून महाविकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
सांगोला विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांनी नुकतीच बैठक घेऊन सर्वानुमते महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष डॉ. धनंजय पवार यांनीही जाहीर सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा दिपकआबांना पाठिंबा जाहीर केला. आबांना पाठिंबा देण्याचा निर्णय आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना विश्वासात घेऊनच घेतला असल्याचेही डॉ. धनंजय पवार यांनी जाहीर केले.