शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला मोठा दणका दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच शेकापच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.त्यामुळे सांगोला तालुक्याच्या उत्तर भागात शहाजी पाटील यांची ताकद वाढली आहे.
सांगोला तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या महुद ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनी लुंबाळ यांच्यासह शेकापच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार शहाजी पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे सांगोल्यात शिवसेनेची शक्ती वाढणार आहे.
महुद ग्रामपंचायतीवर मागील अनेक वर्षांपासून शेकापचे वर्चस्व होते. आमदार शहाजी पाटील यांनी यानिमित्ताने शेकापच्या वर्चस्वाला खिंडार पाडले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजी पाटील यांनी शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे