सांगोला विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या सलग सहाव्या दिवशी मंगळवार, २९ रोजी १९ उमेदवारांनी २५ अर्ज दाखल केले आहेत. ८१ उमेदवारांनी ११४ अर्जांची खरेदी केली आहे.मात्र, आतापर्यंत एकूण ३७ उमेदवारांनी ४८ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शेवटच्या दिवशी निवडणूक कार्यालयासमोर अर्ज भरणार्या उमेदवारांची व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.आज बुधवार, ३० रोजी अर्जांची छाननी होणार आहे. यात कोणाचे अर्ज वैध ठरतात, तर कोणाचे अर्ज अवैध ठरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. याच दिवशी फायनल उमेदवारांची नावे समोर येणार आहेत. २० रोजी मतदान होणार आहे.
Related Posts
सांगोला तालुक्यात प्रथमच आयोजित केलेल्या गरबा दांडिया स्पर्धेला उदंड प्रतिसाद
भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत मित्र परिवाराच्या वतीने छ. शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळ, छ. शिवाजीनगर सांगोला संचलित दांडिया गरबा नाईट स्पर्धेचे…
सांगोला विद्यामंदिरमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी
राज्यातील सर्व जिल्हयांत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी…
मराठा आरक्षणासाठी लग्नाचा मुहूर्त बाजूला ठेवला अन्……
मराठा आरक्षण प्रश्नावर सकल मराठा समाजाने पुन्हा उचल खाल्ली असून शनिवारी सोलापूर शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता आंदोलन करून…