महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपाय योजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.मात्र राज्यातील एक मतदारसंघाबद्दल अशी माहिती मिळाली आहे की येथे नियोजित 20 तारखेआधी देखील दोन दिवस मतदान होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. शासकीय यंत्रणांनाही त्यांनी तसे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 85 वर्षांपुढील तसेच जे दिव्यांग मतदार मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील कुडाळ विधानसभा मतदार संघात 634 मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडे अर्ज भरून दिले आहे. या मतदारांसाठी 15 ते 17 नोव्हेंबरला संबंधितांच्या घरी जावून मतदान घेण्यात येणार आहे. अशी माहिती कुडाळ विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी दिली आहे.