नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ ची मतदान प्रक्रिया दि.२ डिसेंबर रोजी पार पडली असून निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार मतमोजणी दि.२१ डिसेंबर रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे होणार आहे.
सदर मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सैपन नदाफ यांनी दिली.
मतमोजणीकरिता एकूण ६४ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे मतमोजणी प्रशिक्षण दि.१८ डिसेंबर रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर येथे पार पडले. पोलीस प्रशासनामार्फत मतमोजणी बंदोबस्ताकरीता मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली असून मतमोजणी ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतमोजणी प्रतिनिधी यांना ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नसून मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आणण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सैपन नदाफ यांनी दिली.
सांगोला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी व एकूण २१ सदस्य जागांसाठी दि.२ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात ७७.७० टक्के मतदान झाले. तसेच जागा क्र.१ अ व ११ अ साठी एकच नामनिर्देशनपत्र शिल्लक राहिल्याने सदर जागांकरीता मतदान प्रक्रिया पार पडली नाही.
