महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा आवळे यांच्या आळते येथील प्रचार फेरीस उत्स्फुर्त प्रतिसाद!

आमदार राजूबाबा आवळे यांनी आळते गावात प्रचार फेरी काढली याला लोकांतून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आण्णाभाऊ साठे चौकातून प्रचार फेरीस सुरुवात झाली. दर्गारोड , शिवाजी चौक, हावळे गल्ली गुरव गल्ली जैन बस्ती लोहार गल्ली मार्गे फेरी पेठलाईनला आल्यानंतर पार कट्ट्यावर प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली. आमदार राजूबाबा आवळे यांनी आळते गावच्या विकास कामासाठी अडीच कोटी रुपयांचा फंड दिला असून यातून रस्ते समाज मंदिरे आणि शिवतिर्थाची सुसज्ज इमारत उभारली आहे.

यातून उत्तरदायित्व होण्यासाठी राजूबाबांना गत वेळेपेक्षा जादा मतांचे लिड देऊन निवडून देणार अशी ग्वाही शिवसेनेच्या (उबाठा) गटाचे माजी विभाग प्रमुख व माजी उपसरपंच मोहन कोळेकर यांनी दिली. पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रविण जनगोंडा म्हणाले गावातील पंच कल्याण पुजेच्या वेळी राजूबाबा आवळे यांनी जैन समाजातील रस्ते करण्यासाठी सत्तावीस लाख रुपयांचा निधी दिला आहे.

तसेच गुरव टेक ते प्राथमिक आरोग्य केंद्रा पर्यंतच्या रस्त्यासाठी पंचवीस लाखाचा निधी दिला आहे यामुळे त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे. शेतकरी दुध डेअरीचे चेअरमन आण्णा पाटील म्हणाले, धुळोबाकडे जाणाऱ्या रस्त्यास राजूबाबांनी निधी दिल्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या आहेत तर धुळोबा देवाला जाणान्या भविकांना रस्ता सोईचा झाला आहे. दलित महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास कांबळे म्हणाले मातंग समाजासाठी राजूबाबांनी पंचवीस लाख रुपयांचा सांस्कृतिक हॉल बांधून दिला असून आणखीन निधी देण्याची ग्वाही दिली आहे. 

यावेळी लॉर्ड बुद्धा चारीटेबल ट्रस्टचे चेअरमन सुकुमार कोठावळे, बाळासो घाटगे यांची ही भाषणे झाली . या वेळी प्रचार फेरीत काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष भगवान जाधव,  ग्रा.प सदस्य जावेद मुजावर अंकुश कांबळे प्रा. अशोक आळतेकर शक्कील आत्तार, सद्दाम मुजावर तय्यब मुजावर जालंदर कांबळे, सुरेश नाईक विजय कांबळे, राम कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.