आदित्य ठाकरेंची हुपरीत १० जानेवारीला सभा

लोकसभा निवडणुकीचे सगळीकडेच वारे जोर देत आहे. सर्व पक्ष मोर्चे बांधण्यासाठी तयारी करीत असताना पाहायला मिळत आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मोर्चेबांधणीला वेग देण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची हुपरी येथील हुतात्मा स्मारक मैदानावर सभा होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिली.

आदित्य ठाकरे ९ व १० जानेवारीला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्याअंतर्गत त्यांची १० तारखेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सभा होणार आहे. ती येथील हुतात्मा स्मारक मैदानावर घेण्याचे नियोजन आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाप्रमुख जाधव यांनी आज मैदान परिसराची पाहणी केली.