खानापूर मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश 

खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात शेंडगेवाडी, गोमेवाडी, नेलकरंजी, वेजेगाव, माधळमुठी गावांतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुहास बाबर, तानाजी पाटील, अमोल बाबर यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश पार पडले. शेंडगेवाडी येथे ग्रामस्थांनी शिवसेना – महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा दिला. २०१९ च्या निवडणुकीत शेंडगेवाडी गावाने मतदानावर बहिष्कार टाकला होता, गावातील पांडुरंग शेंडगे, कैलास शेंडगे, वसंत तळे, विनायक शेंडगे, नाना शेंडगे, समाधान कचरे, सुखदेव शेंडगे, अण्णा शेंडगे, शिवाजी शेंडगे, उत्तम कचरे, महादेव कचरे ग्रामस्थांनी सुहास बाबर यांना पाठिंबा दिला.

गोमेवाडी (अर्जुनवाडी) येथील तुकाराम खरात, लिंगाप्पा खरात, पप्पू खरात, रमेश अर्जुन, रामभाऊ माने, अनिल खरात, बाळासाहेब खरात, जगन्नाथ अर्जुन, विकास अर्जुन, लक्ष्मण अर्जुन, दाजी माने, विठ्ठल अर्जुन, हनुमंत भुते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नेलकरंजी येथे अगनशेठ घाडगे मगनशेठ घाडगे यांच्या निवासस्थानी जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मादळमुठी येथील राहुल काळुंगे, राजू माळी, अमोल माळी, अजित मोहिते, योगेश जाधव, रितेश भरते, नीलेश काळुंगे, लक्ष्मण काळुंगे, संतोष निकम, अमित काळुंगे, सुरेश काळुंगे, पिराजी माळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वेजेगाव येथे शांताराम देवकर, लालासाहेब देवकर, भानुदास देवकर, बाळकृष्ण देवकर, नानासाहेब देवकर, तानाजी देवकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करत बाबर यांना पाठिंबा जाहीर केला.