ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काँग्रेसच्या कार्यालयात, थेट…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे प्रचारात अतिशय व्यस्त आहेत. ते प्रचंड गडबडीत आहेत. पण असं असताना त्यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न काल एका तरुणाकडून करण्यात आला. यामुळे शिंदे काल प्रचंड संतापले.महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीचं मतदान आता अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या, महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे.

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येऊन प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून प्रचार करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे प्रचारात अतिशय व्यस्त आहेत. ते प्रचंड गडबडीत आहेत. पण असं असताना त्यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न काल एका तरुणाकडून करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचंड संतापले. त्यांना राग इतका आला की थेट काँग्रेसच्या कार्यालयात जाब विचारण्यासाठी गेले, अशी माहिती आहे. पण ज्याने त्यांचा ताफा अडवत गद्दार, गद्दार म्हणून घोषणा दिला त्या तरुणाने आज ठाकरे गटात प्रवेश केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल रात्री ताफा अडवण्याचा प्रयत्न एका तरुणाकडून करण्यात आला होता.

संतोष कटके नावाच्या व्यक्तीने एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला होता. यानंतर संतोष कटके यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती आहे. संतोष कटके यांनी मुंबईत साकीनाका परिसरात एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला होता. तसेच गद्दार, गद्दार म्हणूनही घोषणा दिल्या होता. संतोष कटके यांच्या या कृत्यानंतर एकनाथ शिंदे चांगलेच संतापले. या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या कार्यालयात जावून जाब विचारला.