हातकणंगले मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा आवळे सर्वांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्त्व……

‘सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून आमदार राजू आवळे यांच्याकडे पाहिले जाते. विकासाबाबत त्यांच्याकडे असणारी दूरदृष्टी पाहूनच त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे मत हातकणंगलेचे माजी उपसभापती अजय पाटील यांनी व्यक्त केले. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजू आवळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अजय पाटील म्हणाले, ‘निवडणूक रिंगणात असलेल्या तिन्ही उमेदवारांमध्ये राजू आवळे हेच सर्वात उत्तम पर्याय आहेत.

त्यामुळेच हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच ही भूमिका आम्ही घेतली आहे.’ यावेळी भगवानराव जाधव यांनी प्रास्ताविक केले. कपिल पाटील यांनी आभार मानले.

यावेळी खोचीचे माजी सरपंच बाबासाहेब पाटील, राजूकुमार पाटील, प्रमोद सूर्यवंशी, अमोल पाटील, अश्विन वाघ, तसेच अमोल आडके, अशोक पाटील, जयराम पाटील, संभापूरचे माजी सरपंच प्रकाश झिरंगे, उदय निकम, राजेंद्र मिरजकर, तानाजी भोसले, अस्लम माहालदार, तानाजी भोसले, अरुण कारडे, रावसो कारडे, अवधूत झिरंगे, लाटवडेचे माजी सरपंच संभाजी पवार, अॅड. शहाजी पाटील, किरण माळी, शिवदत्त पाटील, अमर पाटील,

प्रवीण जनगोंडा, जावेद मुजावर, अंकुश चौगुले, आण्णासो पाटील, गुलाब मुल्लाणी, शिरीष थोरात, नितीन योगाण्णा, स‌द्दाम मुजावर, संतोष माळी, संजय वरखटे, अमित नायकवडी, विक्रम साबळे, दत्तात्रय खाडे, पंडित निर्मळे, दिलीप साबळे, रामचंद्र साबळे, ज्ञानू खोत, बबन खाडे, भीमराव चोपडे, अशोक खाडे, मधुकर खाडे, पिंटू खोत आदी उपस्थित होते.