2019 च्या निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी गटातील पळशी गावातील जाधव बंधूंनी शहाजीबापू पाटील यांचा एकदिलाने प्रचार करून त्यांना निवडून आणण्यात मोलाचे योगदान दिले. परंतु गेल्या पाच वर्षात शहाजीबापूंना निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विसर पडल्याने तसेच पक्षात अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने कार्यकर्ते नाराज होऊन दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत आहेत. सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी गटातील पळशी गावातील जाधव बंधूंनी शहाजीबापू गटाला दणका दिला असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेतली.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी भाळवणी गटातून दिपकआबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे. भाळवणी गटातील पळशी गावातील निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या जाधव बंधूंनी शहाजीबापू पाटील गटाला दणका दिला असून मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक कार्यकर्त्याला समान न्याय देण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
भाळवणी गटातील पळशी गावातील पांडुरंग भगवान जाधव, बिभीषण मारुती जाधव, बाबा जाधव, ज्ञानेश्वर जाधव, दत्तात्रय जाधव, लक्ष्मण जाधव, अरुण जाधव, औदुंबर जाधव, समाधान जाधव, नवनाथ जाधव, एकनाथ जाधव, अमोल जाधव, रामदास जाधव, गणेश जाधव, अनिल जाधव या जाधव बंधूंनी दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेची धगधगती मशाल हाती घेऊन सांगोला विधानसभा मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा फडकवणारच आणि दिपकआबांना विधानसभेत पाठवणारच….! अशी ग्वाही शिवसेनेत पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी दिली.