संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन….

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदार संघामध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मतदानास काहीच दिवस शिल्लक राहिल्याकारणाने नेते मंडळींची लगबग सुरू असलेली पाहायला मिळत आहे. महिलांच्या सुरक्षा व सन्मानासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीला निवडून द्या आम्ही आपल्याला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत सौ. प्रियांका राजबाबा आवळे यांनी व्यक्त केले. हुपरी येथे नागरिकांशी संपर्क अभियाना प्रसंगी त्या बोलत होत्या. बुधवारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून मोटारसायकल जनआशीर्वाद रॅली काढण्यात आली.

यावेळी कार्यकर्त्यांसह युवकांचा प्रचंड उत्साह दिसून आला. तसेच नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद देखील पाहायला मिळाला. यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी 176 कोटींची विकासकामे करणारा आणि सर्व सामान्य माणसाला केंद्रस्थानी काम ठेवून काम करण्याची उमेद असलेले आमदार राजूबाबा आवळे हे घराघरात लोकप्रिय आहेत. उसळलेल्या महागाईच्या आगडोंबातून दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडीला व राजूबाबा आवळे यांना विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले.