करीना कपूरचा ‘या’ सेलिब्रिटींसोबत ३६ चा आकडा, एकीला म्हणाली ‘काळी मांजर…’

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. गेल्या अनेक वर्षांपासून बेबो मोठ्या पडद्यावर राज्य करत आहे. पण बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अनेक सेलिब्रिटींसोबत करीनाचे वाद देखील झाले. झगमगत्या विश्वात असे 5 सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्यासोबत करीनाचा ३६ चा आकडा आहे. काही अभिनेते आणि अभिनेत्री देखील करीनाचे शत्रू आहेत. यामध्ये एक अभिनेत्री अशी देखील आहे, तिला करीना काळी मांजर म्हणाली होती… त्या सेलिब्रिटींबद्दल आज जाणून घेऊ…

गेल्या अनेक वर्षांपासून बॉबी देओल  आणि करीना कपूर यांच्यामध्ये वाद आहेत. ‘जब वी मेट’ सिनेमाची ऑफर बॉबीला होती. पण करीनासोबत वाद असल्यामुळे अभिनेत्याला संधी मिळाली नाही. त्यानंतर एकदाही बॉबी – करीना एकत्र दिसले नाहीत. दोघांमधील वाद देखील अनेकदा समोर आले.

 अमिषा पटेल हिच्यासोबत देखील करीनाचा ३६ चा आकडा आहे. करीनाचा ‘रिफ्यूजी’ आणि अमिषाचा ‘कहो ना प्यार है’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. तेव्हा करीनाचा ‘रिफ्यूजी’ फ्लॉप ठरला आणि अमिषाच्या ‘कहो ना प्यार है’ सिनेमाने चाहत्यांना डोक्यावर घेतलं. तेव्हा अमिषा वाईट अभिनेत्री आहे… असं बेबो म्हणाली होती. त्यानंतर दोघींमध्ये वाद सुरु झाले.

करीना – शाहिद रिलेशनशिपमध्ये होते. दोघांची जोडी देखील चाहत्यांना प्रचंड आवडायची. पण काही कारणांमुळे दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर करीना – शाहिद कधीच एकत्र दिसले नाही. ‘उडता पंजाब’ सिनेमात दोघे दिसले पण दोघांचा एकही सीन एकत्र नव्हता.

करण जोहरच्या चॅट शोमध्ये करीना कपूरने जॉनला एक्सप्रेशनलेस अभिनेता म्हटलं होतं. शिवाय जॉनसोबत कधीही काम करणार नसल्याचं बेबो म्हणाली. करिनाच्या या कमेंटमुळे जॉनही चांगलाच संतापला होता. यानंतर दोघांनी पुन्हा कधीही एकत्र काम न करण्याची शपथ घेतली. त्यानंतर आजतागायत हे दोघेही एकाही सिनेमात एकत्र दिसले नाहीत.

‘अजनबी’ सिनेमात दोघींनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांमध्ये वाद झाले. तेव्हा करीना, बिपाशा हिला काळी मांजर म्हणाली होती. तेव्हापासून दोघींमध्ये वाद आहेत. कोणत्या कार्यक्रमात देखील दोघी एकत्र दिसत नाहीत.