टीम इंडियाचा कॅप्टन आणि सर्वांचा लाडका हिटमॅन रोहित शर्मा याने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. रोहित शर्मा पुन्हा बाबा झाला असून पत्नी रितिका सजदेहने (Ritika Sajdeh) मुलाला जन्म दिला आहे, अशी माहिती समोर आली आहे.त्यामुळे आता शर्मा कुटूंबात आनंदाचं वातावरण पहायला मिळतंय. तर सोशल मीडियावर ‘ज्युनियर हिटमॅन’ असा ट्रेंड देखील व्हायरल झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार समोर आलेल्या माहितीनुसार, रोहितची पत्नी रितिका हिने शुक्रवारीच एका मुलाला जन्म दिला. मात्र, दोघांनी यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. लवकर रोहित शर्मा नावही जाहीर करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून रितिका सजदेह प्रेग्नेंन्ट असल्याचे फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते.
अशातच रोहित शर्मा आणि रितिकाकडून याबाबत ऑफिशियल कधी सांगितलं जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांना समायरा नावाची मुलगी आहे. रोहित आणि रितिका यांचा विवाह 13 डिसेंबर 2015 रोजी झाला होता. या दोघांच्या लग्नाला 9 वर्षे पूर्ण होणार आहेत. आता मुलाच्या जन्मानंतर रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
दरम्यान, रोहित शर्मा टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला नव्हता. त्यामुळे तो पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असेल की नाही, यावर खुद्द गौतम गंभीरला देखील माहिती नव्हती. अशातच आता रोहित शर्मा मुलाच्या जन्मानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. पहिल्या कसोटीसाठी रोहित शर्मा उपलब्ध असेल, अशी माहिती देखील मिळतीये.