आगामी विधानसभा निवडणुकीचा आता प्रचार थंडावला आहे. उद्या वीस तारखेला विधानसभा मतदान होणार आहे. बनपुरी येथील माजी सरपंच राजाराम यमगर यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसोबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोलदादा बाबर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहासभैया बाबर यांना पाठिंबा दिलेला आहे.
तानाजीराव पाटील म्हणाले, वडील जाण्याचा आज जो सुहास भैयांच्यावर प्रसंग आला आहे हा प्रसंग माझ्यावर देखील आला होता. त्यामुळे सुहास भैयांच्या पाठीशी उभे राहणे आमचे नैतिक कर्तव्य आहे. गेल्या पाच वर्षात अनिलभाऊंनी आटपाडी तालुक्याला कोट्यवधींची कामे करून विकासाची गंगा आणली आहे. त्यामुळे आम्ही सुहासभैया बाबर यांना जास्तीत जास्त मताधिक्य देणार आहोत असेही पाटील यांनी सांगितले.