उद्या म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.त्या अनुषंगाने निवडणूक आयोगजोरदार तयारीत असून हि निवडणूक सुरळीत पार पडावी म्हणून राजय्त निवडणुकीदरम्यान ड्राय डे घोषीत करण्यात आले आहेत. हे ड्राय डे निवडणूक आगोगाने आखून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचा भाग असतील. त्यामुळे ड्राय डे दरम्यान कोणत्याही विक्रेत्यास मद्यविक्री करण्यास परवानगी नसेल. ड्राय डे चा कालावधीही ठरवून देण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने दारू बंदीसाठी जाहीर केलेल्या तारखा खालीलप्रमाणे
18 नोव्हेंबरः संध्याकाळी 6 वाजल्यापासून मद्यविक्रीवर बंदी.
19 नोव्हेंबरः मतदानाच्या एक दिवस आधी संपूर्ण दिवस ड्राय डे असेल.
20 नोव्हेंबरः मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दारू विक्रीवर बंदी राहील.
23 नोव्हेंबरः निवडणुकीचे निकाल जाहीर होताच संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ड्राय डे लागू केला जाईल.