महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला (बुधवार) पार पडणार आहे. ही निवडणूक आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकांपेक्षा वेगळी आहे.कारण यावेळी सहा प्रमुख पक्ष मैदानात आहेत. तसंच हा सामना थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा आहे. या निवडणुकीत काय होणार? मतदान किती टक्के होणार? जनता कुणाला झुकतं माप देणार? या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं २३ नोव्हेंबरला मिळणार आहेत.
मात्र त्याआधीचा एक महत्त्वाचा अंदाज म्हणजे एक्झिट पोल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काय असेल? याचा अंदाज म्हणजे एक्झिट पोल ( Maharashtra Exit Poll ). एक्झिट पोल ( Maharashtra Exit Poll )कधी येणार? तारीख आणि वेळ काय? हे आपण जाणून घेणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा एक्झिट पोल २० नोव्हेंबर २०२४ या दिवशी येईल. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार एक्झिट पोल्स हे निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतरच जाहीर केले जातात. त्याच्या आधी कुठल्याही प्रकारे निकालाचे अंदाज किंवा एक्झिट पोल देता येत नाहीत. त्यामुळे मतदान संपल्यानंतर म्हणजेच २० नोव्हेंबरला संध्याकाळी ६ नंतर एक्झिट पोल्स जाहीर होतील.
विविध न्यूज चॅनल्स आणि एजन्सी या एक्झिट पोल्स जाहीर करत असतात. विशिष्ट प्रकारे सर्व्हे करुन हे एक्झिट पोल्स जाहीर केले जात असतात. आता या पोल्समध्ये काय अंदाज समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. २० नोव्हेंबरच्या संध्याकाळी ६ नंतर हे पोल्स ( Maharashtra Exit Poll ) येण्यास सुरुवात होईल.एक्झिट पोल्स हे विशिष्ट प्रकारच्या सर्व्हेंवर अवलंबून असतात. कुठल्या मतदारसंघात कसा कल आहे? लोकांना काय वाटतं? याबाबतचा अंदाज घेऊन हे पोल्स जाहीर केले जातात.
महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल आहे. या दरम्यान २० नोव्हेंबरला हे एक्झिट पोल्स जाहीर होतील. यासाठीचा सर्व्हे थेट मुलाखती घेऊन, टेलिफोनवरुन बोलून किंवा ऑनलाइन प्रश्नावलीला मिळालेल्या उत्तरांमधून काढलेल्या निष्कर्षांवर आधारित असतो.