बस व दुचाकीची समोरासमोर धडक,तरुण ठार

बस व दुचाकीची समोरासमोर धडक बसून खाली कोसळलेला तरुण बसच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. खानापूर-पारिश्वाड रस्त्यावरील यडोगा क्रॉसजवळ बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात घडला. संदेश तिवोलकर संदेश उर्फ गोविंद गोपाळ तिवोलकर ( वय २६, रा. दोड्डुहोसुर, ता. खानापूर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

राज्य परिवहनची खानापूर आगाराची बस चापगाव येथून यडोगामार्गे खानापूरला परत येत होती. तर संदेश खानापूर येथून दोड्डुहोसुर गावच्या दिशेने जात होता. यडोगा क्रॉस पासून काही अंतरावर दुचाकी व बसची भीषण धडक होऊ संदेश बसखाली सापडला. डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह खानापूर सरकारी दवाखान्यात आणला.