बॉलिवूडचे जोडपे अभिषेक बच्छन आणि ऐश्वर्या राय बच्छन यांच्यात सर्व काही ठीक नाही याचा महत्त्वपूर्ण पुरावा मिळाला आहे.अभिषेकपासून ऐश्वर्या दूर झाल्या आहेत अशी चर्चा होती. आता ऐश्वर्याने आपल्या नावातून बच्छन आडनाव (Bachchan surname) काढून टाकल्याने आणखी कुतूहल निर्माण झाले आहे. ऐश्वर्याने अभिषेक बच्छनशी लग्न केल्यानंतर आपले नाव ऐश्वर्या राय बच्छन असे बदलले होते. पण काल झालेल्या एका कार्यक्रमात ऐश्वर्याच्या नावापुढील बच्छन नाव काढून टाकण्यात आले आहे. बोर्डवर फक्त ऐश्वर्या राय असे लिहिले आहे.
हे पाहून चाहते ऐश्वर्या राय आणि अभिषेक फक्त दूर झाले नाहीत तर त्यांच्यात घटस्फोट (divorce) झाला आहे असे म्हणत आहेत.दुबईत झालेल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्टार म्हणून आलेल्या ऐश्वर्या राय यांचा फोटो स्क्रीनवर दिसत होता. ऐश्वर्याच्या फोटोखाली त्यांचे नाव टाकण्यात आले होते. पण हे नाव सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ऐश्वर्या राय बच्छन ऐवजी फक्त ऐश्वर्या राय असे नावफलक तुम्ही पाहू शकता.
हा व्हिडिओ व्हायरल होताच युजर्सनी ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोट घेतला असून ही अधिकृत घोषणा आहे असे म्हटले आहे. ऐश्वर्याच्या घटस्फोटाला बहुतेक चाहत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तुम्हाला नेहमीच आमचा पाठिंबा आहे, तुम्हाला पाहून आनंद झाला, तुम्ही अभिषेकपासून दूर व्हा, ही अधिकृत घोषणाच आहे अशा अनेक कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण आतापर्यंत ऐश्वर्या राय असो वा अभिषेक असो त्यांनी आपल्या घटस्फोटाबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.