जिल्हा परिषद पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना जाहीर ; २०१७ च्या निवडणुकीतील प्रभाग संख्या कायम

जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती(Panchayat Samiti) गणांची अंतिम प्रभाग रचना मा. जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली आहे. सांगोला तालुक्यातील ७ जिल्हा परिषद आणि १४ पंचायत समिती (Panchayat Samiti)गणाची प्रभाग रचना कायम राहिली आहे. सण २०१७-१८ म्हणजेच मागील निवडणूका प्रमाणे यावेळीही प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली आहे.

वरिष्ठांच्या आदेशानुसार सांगोला तालुका निवडणूक विभागाकडून प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करून तो मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. यावर कोणत्याही हरकती व सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. दरम्यान माननीय जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अअनुषंगाने जाहीर करण्यात आली आहे.

त्यामुळे २०१७ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे प्रभाग कायम राहिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा विचार न करता निवडणूका तातडीने घ्याव्यात असे आदेश दिल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आणि प्रत तहसिलदार कार्यालयाचे आणि पंचायत समिती कार्यालयात पाहायला मिळणार आहेत अशी माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली आहे.