आष्टा येथे मतदान जनजागृती रॅली

आष्टा नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध मार्गांवरून रॅली काढून मतदान जनजागृती करण्यात आली. मुख्याधिकारी देसाई म्हणाले, लोकशाहीमध्ये मतदानाला महत्त्व आहे. प्रत्येकाचे मत अनमोल असून लोकशाही बळकट करण्यासाठी शहरातील सर्व मतदार बंधूभगिनींनी मतदान करावे. यावेळी प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते, रोहित वायचळ, आर. एन. कांबळे, स्वप्निल पाटील, अनिकेत हेंद्रे, शरदचंद्र पाटील, गणेश घोणे, सचिन मोरे, प्रियांका भोसले, दीपाली चव्हाण, मोनिका पाटील, पूनम पाटील, संतोष खराडे, सुधीर कांबळे, विशाल घस्ते, चंद्रभागा चोरमुले यांच्यासह पालिकेचे कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते.

मतदानाबाबत शपथ घेतल्यानंतर नगर परिषद, ज्योतिर्लिंग चौक अंबाबाई मंदिर, शिंदे चौक अहिल्यादेवी होळकर चौक, दरोजबुवा चौक, कदम वेस, मिरज वेसमार्गे पाटील गल्ली ते नगर परिषद या मार्गावरून कर्मचाऱ्यांनी रॅली काढली नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.