इचलकरंजी, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये औद्योगिक विवाद कलम ५४ मध्ये कामगारांच्या कामकाजाच्या वेळेबाबत आता दिवसाला ८ तासांऐवजी १२ तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ती तरतूद ताबडतोब मागे घ्या. या मागणीसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
कलम ५६ मध्ये आठवड्याचे कामकाजाचे तास ४८ तासांवरून ६०तासांपर्यंत वाढविण्यात आले आहेत. तसेच कलम ६५ मध्ये कामगारांच्या अतिरिक्त वेळेबाबत (ओव्हरटाईम) आता कमाल मर्यादा ११५ तासांवरून १४४ तासांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या कामवाढीमुळे कामगारांना अधिकचा फायदा होणार आहे असे अजब वक्तव्य सरकारकडून करण्यात येत आहे. कामगारांना बारा तास २४ तास काम करायला लावून मालकांच्या फायद्याचे कायदा तर कामगारांना गुलामगिरीत घेऊन जाणारा
उपविभागीय विभागीय हा कायदा ताबडतोब रद्द करा अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी दत्ता माने, आनंदा गुरव, राजेंद्र निकम, सुनील बारवाडे, शिवाजी भोसले, नुरमहमद बेळकूडे, सुभाष कांबळे राजू जुबटे आदी निवेदन देण्यास उपस्थित होते.
