विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वांच्याच हाती आला. संपूर्ण महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागले. या निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आणि ते विजयी झाले. हा निकाल अनेकांना मान्य नसल्याने नसल्याने पराभूत उमेदवार रस्त्यावर उतरले त्यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत त्याचा जाहीर निषेध केला. येणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात तशी मागणी त्यांनी केली. अशा प्रकारचे निवेदन देखील प्रशासनास देण्यात आले. जानेवारी फेब्रुवारी महिन्या दरम्यान निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचा विचार करीत आहे. गेल्या अनेक निवडणुका या ईव्हीएम वरच झालेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका या ईव्हीएम मशीन वरच होतील यात काही शंकाच नाही.
निवडणूक आयोगाने येणाऱ्या निवडणुका या ईव्हीएम मशीन वर घेतल्या तर पराभूत रस्त्यावर उतरणारे उमेदवार हे आपल्या भूमिकेवर ठाम राहतील का? तेही निवडणूक न लढवता बहिष्कार टाकतील का? हे मात्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम ने दिलेला निकाल मान्य असताना विधानसभेला तो मान्य का केला जात नाही असा सवाल महायुतीतील अनेक नेत्यांनी उपस्थित केलेला आहे.
खानापूर आटपाडी मतदारसंघाचा विचार करता सुहास भैया बाबर यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे वैभव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते तर अपक्ष म्हणून माजी आमदार राजेंद्र देशमुख, वंचित बहुजन आघाडीकडून संग्रामनाना माने यासह 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. निकाल झाल्यानंतर त्यांनी या मतदान प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करत त्याचं खापर ईव्हीएम मशीनवर फोडलं.
वैभव पाटील, राजेंद्र देशमुख, संग्राम माने, संभाजी पाटील यांच्यासह अनेक जण या ईव्हीएम मशीन विरोधात रस्त्यावर उतरले. यांनी यावेळी निवडणुकांवर बहिष्कार टाकू अशी भूमिका मांडली. त्यामुळे राजकीय वातावरण हे चांगलेच तापलेलं दिसत आहे. सध्या विटा नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आहे. गेल्या 35 ते 40 वर्षापासून विटा नगरपालिकेवर पाटील गटाची एक हाती सत्ता आहे. विधानसभेच्या निकालानंतर बाबर गटाला आता आपण नगरपालिकेची सत्ता खेचून आणू असा आत्मविश्वास वाढलाय. त्यामुळे पुढील तयारीच लागले.
मात्र दुसरीकडे जर बघितलं तर पराभूत उमेदवार वैभव पाटील यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यांनी या यंत्रणेला यंत्रणा म्हणू की षडयंत्र म्हणू अशी टीका केली. त्यांना या मशीनबाबत शंका आहे. त्यामुळे ते यापुढील निवडणुकीत उतरतात का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अवघे दोन महिने राहिले आहेत. कधीही निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर होऊ शकतो. निवडणूक आयोगाने जर या निवडणुका ईव्हीएम मशीन वरच घेतल्या तर पराभूत उमेदवार आहेत ते रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करतात का? की ते आपल्या भूमिकेवर ठाम राहून निवडणुकांवर बहिष्कार टाकतात असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येणारी विटा नगरपालिकेची निवडणूक ही चांगलीच चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे.