वाळवा तालुक्यातील बागणी येथील श्री नागोबा मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आलेला असून या नूतन मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण व वास्तुशांती सोहळा हा बुधवारी म्हणजेच 25 डिसेंबरला सकाळी दहा ते अकरा यावेळी संपूर्ण होणार आहे अशी माहिती नाभिक समाजाच्या वतीने देण्यात आलेली आहे.
मंगळवारी दुपारी चार ते सायंकाळी सहापर्यंत श्री नागोबा मूर्तीची व कुंभकलश मूर्ती भव्य दिव्य पारंपारिक सहवाद्यात मिरवणूक सोहळा गावातील प्रमुख मार्गावरून होणार आहे. तसेच सायंकाळी सहा ते 11 मूर्तींना धान्यादिवास, जलादिवास, शयनदिवास करण्यात येणार आहे व बुधवारी 25 डिसेंबर रोजी सकाळी सहा ते अकरा पर्यंत पूजा पाठ व होम हवन होणार आहे. सकाळी दहा ते अकरा या वेळेत मूर्ति प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम होणार आहे. तसेच दुपारी 12 नंतर महाप्रसाद देखील आयोजित केलेला आहे.