सांगोला तालुक्यात वीज पडून महिलेचा मृत्यू!

सांगोला तालुक्यात काल पावसाने हजेरी लावली सुसाट वाहणारे वादळी वारे व अवकाळी पावसाचा चांगला तडाका सांगोला तालुक्याला बसलेला आहे. या अवकाळी पावसामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झालेले आहेत. पाचेगाव बुद्रुक येथे अंगावर वीज पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे.

तसेच दोन जर्सी गायसह नवी लोटेवाडी येथे अंगावर वीज पडून जर्सी गायचा जागीच मृत्यू झालेला आहे. तसेच घेरडी येथे वीज पडल्याने आग लागून बाराशे पेंडी कडबा जळालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगोला तालुक्यात खूपच उकाडा जाणवत होता. अशातच शुक्रवारी दुपारनंतर वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.

शनिवारी पुन्हा दुपारी तीन वाजेपर्यंत प्रचंड तापमान होते आणि सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक सुसाट वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला आणि शहरासह अनेक गावात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे हा पाऊस पडत होता. अंगावर वीज पडून संगीता भारत बागडे वय. ४० या महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे.