इस्लामपूरातील पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने दाखविला प्रामाणिकपणा

इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील दूध संघातील पेट्रोल पंप कर्मचारी  राहुल कदम यांनी दिवसभरातील पेट्रोलचा भरणा करताना ऑनलाइन ३०० रुपये जादा आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ते पैसे बाजूला ठेवून दुसऱ्या दिवशी ते परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल उपस्थित ग्राहकांसह कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील किरणकुमार हमसागर यांनी इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील दूध संघातील पेट्रोल पंपावर दुचाकीत ३०० रुपयांचे पेट्रोल भरले.

त्यांची मुलगी स्वरा किरणकुमार हणमसागर हिच्याकडून मोबाइलवरून पैसे पाठविताना दोन वेळा पैसे खात्यावरून गेले. घरी गेल्यानंतर दोन वेळा पैसे गेल्याचे स्वराच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपावर कदम यांच्याकडे चौकशी करण्यापूर्वीच त्यांनी ३०० रुपयांची रक्कम स्वराच्या हाती दिली. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल हणमसागर कुटुंबासह उपस्थित ग्राहकांनी त्यांचे कौतुक केले.