प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या संपर्कात? गडकरींचा इस्लामपूर दौरा, भाजप प्रवेशाच्या चर्चांची झालर

अनेक वेळा राजकारणात विविध घडामोडी घडताना दिसतात. अनेक पक्षप्रवेश पहायला मिळतात. एकूणच राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र सर्वानीच पहिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवारांचे 40 आमदार त्यांच्या सोबत गेले. तर पक्षाचे काही दिग्गज नेत्यांनी भाजपसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आता काही दिवसांपूर्वीच आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवार राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यानंतर आणखी काही नेते भाजपसह इतर पक्षांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यादरम्यान प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटीलचं भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

तर या चर्चांना भाजपचे केंद्रीय नेते आणि रस्ते वाहतूक, महामार्गमंत्री नितीन गडकरी यांचा सांगली दौरा कारणीभूत ठरला आहे. गडकरी इस्लामपूर येथील राजारामबापू शिक्षण व उद्योग समूहाला भेट देणार आहेत. गडकरी शैक्षणिक संस्थांमधील विकास कामांच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. मात्र खरे कारण हे जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांची झालर आहे.

सध्या पक्षात प्रदेशाध्यक्ष पद बदलाच्या हालचालींना वेग आला असतानाच जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाबद्दल देखील उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पण जयंत पाटलांचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच राजारामबापू शिक्षण आणि उद्योग समूहातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून याबाबत कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

सध्या भाजपच्या वाटेवर अनेक नेते असल्याचे बोलले जात आहे. यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रदेशाध्य जयंत पाटील यांचे देखील नाव आहे. जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या असून त्यांची भेट भाजपचे केंद्रीय नेते आणि रस्ते वाहतूक, महामार्गमंत्री नितीन गडकरी घेणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे सांगली जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

नितीन गडकरी 17 फेब्रुवारी रोजी राजारामबापू शिक्षण व उद्योग समूहाला भेट देणार आहेत. ते येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या आरआयटी या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय प्रांगणात सुसज्ज आणि अद्ययावत इमारतीचे उद्घाटन करतील. विशेष बाब म्हणजे जयंत पाटील यांचा रविवार 16 फेब्रुवारी रोजी वाढदिवस असून दुसऱ्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. मध्यंतरी बुलडाणा येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात जयंत पाटलांनी भाजप नेते गडकरींच्या कामाची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. अर्थात शहरी भार्गापासून ग्रामीण भागापर्यंत तसेच विविध राजकीय वर्तुळात देखील गडकरी यांच्या कर्तृत्वाबद्दल पक्षीय मतभेद विसरून त्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा केली जाते.