इस्लामपुरामध्ये तरुणावर कोयत्याने वार! एक ताब्यात, जखमीची प्रकृती स्थिर

इस्लामपूर शहरातील बहे रस्त्यावरील एका रुग्णालयाच्या ना चौकात पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या न डोक्यात कोयत्याने वार करणाऱ्या ना टोळीतील एकास पोलिसांनी ताब्यात दे घेतले आहे. यातील इतर हल्लेखोर ने. परागंदा झाले आहेत. या हल्ल्यातील जखमीची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. ज्ञानेश भीमराव पवार (वय ३०) र्वी असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या की तरुणाचे नाव आहे. तर, संतोष बंडगरया हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यामागील कारस्थानाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे तपासाबाबत पोलिसांकडून गोपनीयता पाळली जात आहे. ज्ञानेश पवार याच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.