नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वांच्याच हाती आला. या निवडणुकीत महायुतीने सर्वोच्च मताधिक्य मिळवून विजय प्राप्त केलेला आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजीला महायुतीचेच आमदार निवडून आले आहेत. भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना सज्जतेचे आदेश दिले आहेत; तर पक्षाचा विस्तार करण्यावर आपला भर राहील, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. शिंदे शिवसेनेने राज्यात 57 जागा जिंकल्या असून त्यांचाही विस्तारावर भर राहणार आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीमध्ये सत्तेसाठी चुरस असेल.इचलकरंजी नगरपालिका 2021 मध्ये विसर्जित झाली. तेथे भाजपचे 14 तसेच भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी नगराध्यक्षा राहिल्या.
2016 साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सुरेश हाळवणकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप 14, प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस 18 व एक स्वीकृत सदस्य, अशोकराव जांभळे यांच्या नेतृत्वाखालील 7 व एक स्वीकृत, सागर चाळके यांची ताराराणी आघाडी 11, मदन कारंडे यांची राजर्षी शाहू आघाडी 10 व एक स्वीकृत सदस्य अपक्ष 1 व शिवसेना 1 असे पक्षीय बलाबल होते. 2019 मध्ये प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस सोडली.
आता नगरपालिकेत प्रशासकीय कारकीर्द आहे.एकेकाळी केवळ काँग्रेसचा बालेकिल्लाच नव्हे तर काँग्रेसची अर्थवाहिनी असलेल्या काँग्रेसला इचलकरंजीत अस्तित्व शोधण्याची वेळ आली आहे. इचलकरंजी नगरपालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. विसर्जित नगरपालिकेत भाजपचे प्राबल्य राहिले. इचलकरंजी नगरपालिकेची महापालिका झाल्यानंतर आता होणार्या पहिल्याच निवडणुकीत महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी चुरस असेल.