इस्लामपुरात ३१ मे पासून अंधश्रद्धा निर्मूलन बैठक!

इस्लामपूर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठक शुक्रवार दि. ३१ मे, शनिवार १ व रविवार २ जून रोजी इस्लामपूर येथे आयोजित करण्यातआली आहे .३६ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी येणार राज्यातील १९ विभागांचा आढावा घेतला जाणार अशी माहिती महाराष्ट्र अं.नि.स.चे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे, राज्य उपाध्यक्ष प्रा. शामराव पाटील, प्रा. डॉ. नितीन शिंदे यांनी दिली. तीन दिवसांची राज्य बैठक विजया सांस्कृतिक भवन इस्लामपूर येथे होणार आहे.
संघटनेच्या राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी, ३६ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी असे २५० ते ३०० प्रमुख पदाधिकारी या राज्य बैठकीत प्रतिनिधीत्व करणार आहेत.

या राज्य बैठकीत एकूण १९ विभागांच्या विविध उपक्रम शनिवार दि. १ जून सायंकाळी ४ ते ६ या वेळेत अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे राज्यस्तरीय लक्ष्यवेधी व शतकवीर पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ विचारवंत व धरणग्रस्त चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्याहस्ते होईल. अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे संपादक प्रा. नितीन शिंदे, उत्तम जोगदंड व संपादक मंडळातील मान्यवर उपस्थित असतील. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. १ जून सायंकाळी ६.३० वाजता इस्लामपूर शहरातून संविधान सन्मान फेरीचे आयोजन केले आहे.

राज्य बैठकीचा समारोप ज्येष्ठ संपादक व साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या उपस्थित होईल.सर्व कामाचा आढावा, पुढील वर्षभराचे नियोजन केले जाईल. जिल्ह्यातील कामांचे सादरीकरण आणि पुढील कामाचे भविष्यवेध निश्चित केले जाणार, गटचर्चा, बौद्धिक सत्रे घेतली जाणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन आहे. संघटनात्मक धोरण ठरवण्याचे काम या बैठकीत केले जाणार आहे.