डॉ.बाबासाहेब देशमुख येण्यापूर्वीच केले रुग्णवाहिकेचे उद्घाटन; शे.का.प कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून सांगोला तालुक्यातील नाझरा,अकोला,महुद,कोळा, जवळा,घेरडी या प्राथमिक आरोग्य केंद्रांना अँब्युलन्स मंजूर झाल्या आहेत.सांगोला तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नव्याने मिळालेल्या सहा रुग्णवाहिके चे पूजन शिंदे शिवसेना चे मा.आमदार शहाजी (बापू) पाटील यांनी सद्याचे निवडून आलेले नूतन विद्यमान आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांना डावलत ते येण्यापूर्वीच श्रीफळ वाढवून रुग्णवाहिके चे उद्घाटन केल्याने शेतकरी कामगार पक्षातील कार्यकर्त्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

आचार संहिता लागू असल्याने हा उद्घाटन समारंभ काल शनिवार दि.३०.११.२०२४ रोजी सांगोला पंचायत येथे आयोजित करण्यात आला होता. दुपारी अडीच वाजता या अँब्युलन्स चे उद्घाटन होणार होते मात्र विद्यमान नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे कार्यक्रम ठिकाणी येण्यापूर्वीच पाच मिनिटे अगोदर मा.आ. शहाजी बापू पाटील यांनी या अँम्बुलन्सला नारळ वाढवून उद्घाटन केले आयोजकांनी त्यांना विद्यमान नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे येत आहेत पाच मिनिटे थांबा ही विनंती केली.

मात्र मा.आ.शहाजी (बापू) पाटील यांनी मला मुख्यमंत्र्यांना भेटायला मुंबईला जायचे आहे असे कारण सांगून विद्यमान आमदार येण्यापूर्वीच नारळ फोडून उद्घाटन केले आणि तिथून काढता पाय घेतला या घडलेल्या घटनेबाबत शेतकरी कामगार पक्षातील कार्यकर्त्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

 तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी प्रोटोकॉल प्रमाणे विद्यमान आमदर डॉ.बाबासाहेब देशमुख हे आल्यानंतरच उद्घाटन करणे गरजेचे असताना त्यांनी त्यांची वाट न बघता उद्घाटन केल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शे.का.पक्ष व पुरोगामी संघटना यांचे कडून नाराजी व्यक्त होत आहे.