टेंभुर्णीत राष्ट्रवादी काँग्रेस व आरोग्य विभागातर्फे वारकर्यांना वैद्यकीय सेवा

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी राष्ट्रवादी कांग्रेस व अरोग्य विभाग यांच्या वतीने औषदोपचार शिबीर झाले. माजी आमदार बबनराव शिंदे व युवा नेते रणजितसिंह शिंदे यांच्या मार्दर्शनाखाली माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांच्या प्रयत्नातून या सोलापूर जिल्हा आरोग्य विभाग यांच्यावतीने १७ वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ भाजपचे माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांच्या हस्ते श्री पांडुरंगाच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. यावेळी माढा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन तुकाराम ढवळे , राज्य ऊसदर नियंत्रण समितीचे सदस्य शिवाजीराव पाटील , कृषी उत्पन्न बाजार , समितीचे संचालक दिलीप पाटील, टेंभुर्णी (Tembhurni) ग्रामपंचात सदस्य सचिन होदाडे , रामभाऊ शिंदे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव शब्बीर जहागीरदार , दीपक पाटील रामभाऊ नवले , अमोल देवकर महिला आघाडीच्या अध्यक्ष सविता जगताप , स्वाती टोपणे आदी मान्यवर उपस्थित होते. टेंभुर्णी आरोग्यकेंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ. शुभम सरकळे , डॉ. सायली माळी , आरोग्य सहा. सुहास माळी , आरोग्यच्या सेविका उपस्थित होत्या .