मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून महिलांमध्ये ही योजना चांगलीच लोकप्रिय झाली आहे. आता या योजनेबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. ही योजना कधीपर्यंत सुरू राहणार याबद्दल महायुती सरकारमधील नेत्याने स्पष्टच सांगितलं आहे.ही योजना निरंतर सुरू राहणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजनेसाठी कर भरणाऱ्या महिलांचा अर्ज अपेक्षित नाही असंही त्यांनी नमूद केलं. इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलेने या योजनेसाठी अर्ज केला तर ते अपेक्षत नाहीये. ही योजना तर निरंतर सुरू असणार आहे. पण 2100 रुपये कधीपासून होतील हे सांगण्याचा आज माझा अधिकार नाही.कॅबिनेटची मिटींग होईल, त्यामध्ये यावर चर्चा होईल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.
Related Posts
४ जूननंतर जयंत पाटील हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागत आहे. केंद्रात फिर एक बार मोदी सरकार येणार की इंडिया आघाडी धक्का देणार…
PM Kisan Yojana: ‘या’ महिन्यात येऊ शकतो PM Kisan योजनेचा 19 वा हप्ता
केंद्र आणि राज्य सरकार देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहेत. या योजनांचा उद्देश देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक…
वाहनांच्या किंमतीत होणार वाढ, नवीन दर ‘या’ तारखेपासून लागू?
देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटार्सच्या बाबतीत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. टाटा मोटार्सने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने…