हुपरीत भरधाव कारने चक्क तीन दुचाकींना उडवले!

अलीकडच्या काळात अपघातांच्या प्रमाणात भरपूर वाढ झालेली दिसून येते. बरेचजण हे मद्य प्राशन करून देखील गाडी चालवल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. हातकणंगले तालुक्यातील हुपरीमध्ये बेधुंदपणे कार चालवून तीन मोटरसायकली उडवल्याची धक्कादायक घटना घडली.

जमावाने कारचालक तरुणाला पकडून बेदम चोप दिला.तसेच चार चाकी कारची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. दुकानाच्या दारात बसण्यास विरोध केल्याच्या रागातून तीन दुचाकी उडवल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर हुपरीमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. काल रात्री ही घटना घडली. तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.